न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पंढरीत आतापासूनच भक्तांचा पूर… दर्शनासाठी ८ते १० तासांचा कालावधी

सोलापूर/ प्रतिनिधी

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सध्या पंढरपुरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. श्री विठ्ठल मंदिराच्या दर्शन रांगेत सुमारे ३० ते ३५ हजार भाविक उभे असून रांग सुमारे तीन किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. दर्शनासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागत आहे. दर्शन रांगेतील सातही पत्रा शेड भाविकांनी भरले असून मुखदर्शनासाठीही मोठी गर्दी होत आहे दर्शन रांगेत भाविकांना चहा, पाणी नाश्ता, जेवण,तसेच आरोग्याच्या ही सुविधा मंदिर समिती मार्फत देण्यात आलेले आहेत येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन व्यवस्था देण्यासाठी आता मंदिर समिती सज्ज झाली आहे.

दरम्यान व्हिआयपी दर्शन बंद केल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे १०ते १२तासांचा वेळ वाचणार आहे.पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सक्त ताकीद दिली असून वारकऱ्यांची सेवा हिच विठ्ठल सेवा असल्याने व्हिआयपी दर्शनासाठी कुणीही येऊ नये… आल्यास मुखदर्शन घ्यावे असे आवाहन केले आहे

4.5/5 - (2 votes)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे