शिक्षणाधिका-यांसह केंद्रप्रमुखाच्या जाचाला कंटाळून. दोन मुलांसह शिक्षकाची कार नदीत घालून आत्महत्या
नांदेड/ अशोक साबळे
व्हाटसपला स्टेट्स ठेऊन दोन मुलांसह जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने वरिष्ठान्ना दोष देत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील पुणे गाव परिसरातील आमदुरा घाटावरुन गोदावरी नदी पात्रात गाडी घालून चिमुकल्यासह आपली जीवनयात्रा संपवलीये. सुनील मोरे असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून ते हिमायतनगरच्या पोटा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कर्तव्यावर होते.
एसडीआरएफच्या पथकाने कार आणि कार मधील तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर बाहेर काढले आहेत. शिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखाच्या जाचाला कंटाळलो असल्याचे व्हाट्सअपला ठेवलेल्या स्टेट्सलामध्ये शिक्षकाने म्हटलंय. शिक्षक सुनील मोरे हे भोकर तालुक्यातील बेंबर गावचे मूळ रहिवासी होते. त्यांच्या मुलीच सारा असं नाव असून मुलाचे सुमित असे नाव आहे. या घटनेने शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ माजली असून एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आपल्या चिमुकल्यासह आत्महत्या केल्याने नांदेड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे


