न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजपच्या संदीप गावडेना उबाठा शिवसेनेच्या रुपेश राऊळांचे कडवे आव्हान

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राऊळ यांच्या उमेदवारीमुळे भाजपचे अधिकृत उमेदवार संदीप गावडे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ठाकरे शिवसेना तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातून कोणाला उमेदवारी देणार ? याकडे सर्वांचे लक्ष होते. आज रूपेश राऊळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते म्हणाले, सावंतवाडी तालुक्यात आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवत आहोत. महाविकस आघाडीसाठी आम्ही आग्रही आहोत. तर, आपल्यासोबत पक्षाचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आणि मतदार असून जनता मला निष्ठेच फळ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत उप जिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, दिनेश सावंत यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे