सावंतवाडीला पाणी टंचाईची भिती नाही… मुख्याधिकारी विनायक औंधकर
सिंधुदुर्ग / राजू तावडे
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असली, तरी सावंतवाडी शहराला मे महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईची चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगत, दिवसातून एक वेळ आणि सव्वा तास पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिली.
सावंतवाडी शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना दिलासा देताना मुख्याधिकारी औंधकर यांनी पालिकेकडे उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याची माहिती दिली. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असली, तरी सावंतवाडी शहराला मे महिन्यापर्यंत पुरेल एवढे पाणी उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका खबरदारी घेत असून, दिवसातून एक वेळ आणि सव्वा तास पाणी दिले जाणार आहे.
दरम्यान, शहरातील ५० कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेच्या कामाची पाहणी करण्यात आली. या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, ते चांगल्या दर्जाचे होण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. योजनेच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अभियंते आणि सुपरवायझरची नेमणूक करण्यात आली आहे. कामाची गुणवत्ता राखण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्याधिकारी औंधकर यांनी सांगितले.
सावंतवाडी शहरातील खासगी आणि सार्वजनिक विहिरींचे सर्वेक्षणही करण्यात आले आहे. या विहिरींमध्ये सध्या पाणी उपलब्ध असल्याने शहरात पाणीटंचाईची समस्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना सावंतवाडी शहरासाठी मे महिन्यापर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य


