न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

शिर्डीत गुरूपौर्णिमेला साईदर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती… मंदीर रात्रभर खुले

अहिल्यानगर/ प्रतिनिधी

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी  राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. राज्‍याच्‍या विविध भागातून आलेल्‍या पालखीतील साईभक्‍तांच्‍या साईनामाच्‍या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.

श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मुख्‍य दिवशी समाधी मंदिरात संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश शिवाजी कचरे व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. पद्मिनी कचरे यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदिर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात आदी उपस्थित होते.

सकाळी ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान झाले. श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या निमित्‍त सकाळी ०७.०० वाजता संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश शिवाजी कचरे व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. पद्मिनी कचरे यांनी श्रींची पाद्यपूजा केली. तर, सकाळी ८.०० वाजता लेंडीबागेतील शताब्‍दी ध्‍वजाचे पुजन करण्‍यात आले.
दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत गायिका, संगीतकार व संगीत दिग्‍दर्शक, डॉ. मोनिका साई, लखनऊ यांचा साई भजन कार्यक्रम संपन्‍न झाला. दुपारी ०४.०० ते ०६.०० वा. यावेळेत ह.भ.प. वेदश्री वैभव ओक, डोंबिवली (पु) यांचा कीर्तन कार्यक्रम झाला असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती झाली . सायं. ०७.३० ते १०.०० यावेळेत प्रसिद्ध गायक, संगीतकार, शैलेंद्र भारती, मुंबई यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मं‍डपाच्‍या स्‍टेजवर सुरू झाला, रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून आजची श्रींची शेजारती व उद्या दिनांक ३० जुलै रोजीची पहाटेची श्रींची काकड आरती होणार नाही. आज रात्रौ १०.०० ते पहाटे ०६.०० वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होईल. उत्सवानिमित्त कर्नाटक येथील दानशूर साईभक्त श्री. एस. प्रकाश यांच्‍या देणगीतुन मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली.
आज श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे मुख्‍य दिवशी आंध्र प्रदेशातील एलुरु येथील साईभक्त श्री. एम. श्रीनिवास राव यांनी श्री साईबाबांच्या चरणी ६२९ ग्रॅम वजनाचा नवग्रहांचे आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. या सुवर्ण मुकुटाचे देणगी मुल्‍य सुमारे ८२ लाख ३९ हजार २७१ रुपये आहे. तर, मंबई येथील एका साईभक्‍ताने श्री साईबाबांच्या चरणी ३०० ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण हार अर्पण केला. या सुवर्ण हाराची अंदाजे किंमत सुमारे ४७ लाख रुपये असून,भाविकांच्या श्रद्धा व भक्तीचे हे एक अनमोल प्रतीक आहे.
उत्‍सवाच्‍या सांगता दिनी गुरुवार, दिनांक ३० जुलै रोजी पहाटे ०६.०० वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, सकाळी ०६.५० वा. श्रींची पाद्यपुजा,  सकाळी ०७.०० वा. श्रींचे गुरुस्‍थान मंदिर येथे रुद्राभिषेक होणार असुन सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. वेदश्री वैभव ओक, डोंबिवली (पु) यांचे काल्‍याचे कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वा. श्रींची माध्‍यान्‍ह आरती होईल. दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत निरज शर्मा (टी सिरीज), नवी दिल्‍ली यांचा साई भजन कार्यक्रम होणार असून दुपारी ०४.०० ते ०६.०० वा. यावेळेत राज आचार्य, कोलकत्‍ता साई कि लिला कार्यक्रम होईल. सायंकाळी ०७.०० वा. श्रींची धुपारती होईल.  सायं. ०७.३० ते ०९.३० वा. यावेळेत विजय साखरकर, बोरीवली (पु) यांचा साईस्‍वर नृत्‍योत्‍सव कार्यक्रम होईल. या दिवशी गुरुवार असल्‍याने रात्रौ. ०९.१५ वा. श्रींचे गुरुवारचे नित्‍याचे पालखीची मिरवणुक होईल. तर रात्रौ १०.०० वा. श्रींची शेजारती होईल.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे