आनंद शिशु वाटिका शाळेमध्ये बालचमूंनी मोठ्या उत्साहात साजरी केले गुरुपौर्णिमा
सिंधुदुर्ग / राजू तावडे
आज गुरुपौर्णिमा… चिमुकल्यांना अनौपचारिक शिक्षणासोबतच नेहमीच चांगले संस्कार घडविणाऱ्या कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या आनंद शिशुवाटिका शाळेमध्ये आज मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. हिंदू संस्कृतीतील एक महान ऋषी व ग्रंथकार महर्षी व्यास यांची मुलांना माहिती देण्यात आली. व्यास मुनींची वेशभूषा करून चिमुकल्यांनी नाटिका सादर केले.
गुरु ईश्वर तात माय, गुरु विना जगी थोर काय अशी प्रार्थना करत सर्व चिमुकल्यांनी आपली पहिली गुरू म्हणजे आपली आई व आपल्या गुरुवर्यांना वंदन केले.


