न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मंत्री गोविंद गावडे यांच्यावर शुक्रवारीच कारवाई… दामू नाईक

पणजी /वृत्तसंस्था

मंत्री गोविंद गावडे यांनी गेल्या काही वर्षांत वारंवार पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचा आरोप करत, त्यांना यापुढे कोणतीही माफी दिली जाणार नसल्याचे गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले. गावडे यांच्यावर येत्या शुक्रवारी कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर गावडे यांनी केलेल्या वक्तव्यांवरून विरोधकांनी टीका सुरू ठेवली आहे. यापूर्वीही कला अकादमी प्रकरण, मंत्री सुदिन ढवळीकर आणि सभापती रमेश तवडकर यांच्याशी वाद, तसेच माजी संचालक दशरथ रेडकर यांना दिलेल्या कथित धमकीमुळे गावडे वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत.

फोंड्यातील ‘आदिवासी प्रेरणा दिन’ कार्यक्रमात गावडे यांनी स्वतःच्या सरकारवरच टीका करत आदिवासी कल्याण खात्याचे प्रशासन ढिसाळ असल्याचा आरोप केला होता. तसेच, कर्मचाऱ्यांनी दिलेले कामच करावे आणि कंत्राटदारांकडून फायली पुढे नेण्यासाठी व्यवहार होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता.

मंत्री गोविंद गावडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची पक्षाने गंभीर दखल घेतली असून त्यांच्याविरोधात ३० जुलै रोजी योग्य ती कारवाई केली जाईल, असे गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

आदिवासी कल्याण खाते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे असल्याने राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे तसेच सभापती रमेश तवडकर यांनी मंत्री गावडे यांना सुनावल्याची माहिती समोर आली आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कारवाईचे आश्वासन दिले होते.

दामू नाईक यांनी सांगितले की, मंत्री गावडे यांच्या वक्तव्याची दखल दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाने आधीच घेतली आहे. यासंदर्भातील अहवालही पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षाने त्यांना कारवाईचे अधिकार दिले असून त्याअंतर्गत तीन प्रकारची कारवाई करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

सध्या गोविंद गावडे हे गोव्याबाहेर असून २९ जुलै रोजी ते गोव्यात परतणार आहेत. त्यानंतर ३० जुलै रोजी त्यांना पक्षाकडून बोलावण्यात आले असून, त्याच दिवशी त्यांच्या वक्तव्याबाबत योग्य तो निर्णय आणि कारवाई जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे