पुणे एक कोटीचं दरोडा प्रकरणी चोरीला पोलिसांचीच साथ… दोन पोलीसांची नोकरी गेली
पुणे / वृत्तसंस्था
व्यापाऱ्याला धमकावून एक कोटी रुपये लुटण्याच्या प्रयत्नात पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचाच थेट सहभाग असल्याचं उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात निष्काळजीपणा आणि गुन्हेगारी कटात सहभाग आढळल्यानं पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्त्री या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


