न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार केसरकर यांच्या निवासस्थानी श्री साई पालखी पूजन सोहळ्याचे आयोजन

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

   सालाबादप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक २८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता श्री साई पालखीचे आमदार दीपक केसरकर यांच्या ‘श्रीधर अपार्टमेंट’ या निवासस्थानी आगमन होणार आहे.

याप्रसंगी आमदार दीपक केसरकर आणि सौ. पल्लवी केसरकर यांच्या हस्ते श्री साई पालखीचे पूजन पार पडणार आहे. या पूजन सोहळ्यास सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे निमंत्रण आमदार दीपक केसरकर यांनी दिले आहे.

तसेच, बुधवार, २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता श्री साई पालखी माडखोल येथे रवाना होणार आहे. या संपूर्ण पालखी सोहळ्यास व दर्शनासाठी सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे