ज्येष्ठ शिवसैनिक उत्तम वाडकर याच्यावर साश्रूनयनानी अंत्यसंस्कार
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार उत्तम वाडकर यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने जुने शिवसैनिक तसेच सामाजिक राजकीय व पत्रकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.वाडकर हे एक निष्ठावान शिवसैनिक असल्याने त्याना शिवसेनेच्या वतीने भगवी शाल अर्पण करण्यात आली यावेळी अनेक शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले.
उत्तम वाडकर त्यांचे रविवारी निधन झाले.वाडकर याच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरताच वाडकर यांच्या काळातील अनेक शिवसैनिक सावंतवाडीत आले होते. त्यांनी वाडकर यांना श्रध्दांजली अर्पण करून संदिप टोपले सह अन्य शिवसैनिकांनी भगवी शाल त्याच्या पार्थिव देहावर अर्पण केली. शिवसैनिकांनीतश वाडकर यांना श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हाप्रमुख संजू परब, ॲड. बापू गव्हाणकर, आनंद नेवगी, उध्दव सेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, भाई देऊलकर, विनोद काजरेकर, चंद्रकांत कासार, आबा केरकर, विलास सावंत, सुधीर पराडकर, अशोक धुरी, संदिप राणे, आजो मांजरेकर, संतोष गावस, सुरेश भोगटे, दत्ताराम गावकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, अनंत जाधव, साप्ताहिक संघटनेचे अध्यक्ष नितीन तळेकर, दिव्या वायंगणकर, संजीवनी देसाई, दिलीप हिंदळेकर, मनोज माळकर, हर्षवर्धन धारणकर, ॲड. सुनिल लोढ आदि उपस्थित होते.


