न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

महामार्गावर अज्ञात इसमाने सोडली ५ गुरे; वाहतुकीस अडथळा, लावणी पिकांचे नुकसान

 

​सिंधुदुर्ग/ राजू तावडे

‌मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नेमळे एरंडवाक वाडी येथे सोमवारी एका अज्ञात इसमाने एक गाय आणि चार बैल आणून सोडले. महामार्गावर अचानक सोडण्यात आलेल्या या गुरांमुळे वाहनधारकांना मोठा अडथळा निर्माण होत असून, परिसरातील शेतकऱ्यांनी केलेल्या लावणी पिकांचेही गुरे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत.
​सध्या टेम्पो किंवा इतर वाहनांतून गुरांची वाहतूक करण्यास कायदेशीर बंदी आहे. त्यामुळे गुरांची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा त्यांना सांभाळणे टाळण्यासाठी अज्ञात व्यक्तींकडून अशा प्रकारे कोणत्याही गावात किंवा थेट महामार्गावर गुरे आणून सोडून देण्याचे प्रकार वाढत आहेत.
सध्या भात लावणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून शेतात नुकतीच लावणी पूर्ण झाली आहे. ही गुरे थेट शेतांमध्ये घुसून लावणी पिकाची नासधूस करत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
​संबंधित पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन महामार्गावर बेकायदेशीरपणे गुरे सोडून जाणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घ्यावा, तसेच या गुरांचा तातडीने बंदोबस्त करून शेतकरी व वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी नेमळे ग्रामस्थांकडून केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे