न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सुपीक जमीन वाचवण्यासाठी कोल्हापुरातील सैनिक टाकळी गावच्या ग्रामस्थांचा एल्गार

कोल्हापूर / वृत्तसंस्था

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सैनिक टाकळी गावातील ग्रामस्थांनी प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सुपीक शेती, शेतीवर आधारित रोजगार आणि पर्यावरण धोक्यात येणार असल्याचा दावा करत ग्रामस्थांनी प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. शासनाने ग्रामस्थांची संमती न घेता जमीन संपादनाची प्रक्रिया राबविल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. जोपर्यंत एमआयडीसीचा निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे एमआयडीसी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे