न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत श्री औदुंबर स्वामी मंदिरात २९ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सव

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

   सावंतवाडी पोलीस स्टेशन नजीकच्या श्री औदुंबर स्वामी समर्थ मंदिरात २९ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त मंदिरात दिवसभरात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व स्वामी भक्तांनी उपस्थित राहून स्वामी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

बुधवारी सकाळी ८ वाजता श्री. भगवान नाईक व सौ. भारती नाईक यांच्या हस्ते श्री स्वामींना अभिषेक व तुळस पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होईल. सकाळी ९ वाजता मंदिर निर्माणासाठी सहकार्य करणाऱ्या दात्यांचा सत्कार सोहळा माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होणार आहे.

दिवसभरातील इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत नामजप व पोथीवाचन होणार असून दुपारी १ वाजता महाआरती आणि १:३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत भजनाचा कार्यक्रम आणि ७ ते ७:३० दरम्यान पुन्हा महाआरती होणार आहे. ज्या भक्तांना अन्नदान करण्याची इच्छा असेल त्यांनी निधी किंवा धान्याच्या स्वरूपात सहकार्य करावे, असे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९२२३१६७७७ किंवा ९६०७२९३५८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे