सावंतवाडी पथविक्रेता समिती सदस्यपदी नाझिया डिसूझा यांचीबिनविरोध निवड
सिंधुदुर्ग /राजू तावडे
सावंतवाडी पथविक्रेता समिती सदस्यपदी नाझिया मनवेल डिसूझा यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. पथविक्रेत्यांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने २०१७ मध्ये ही समिती स्थापन केली होती. या समितीच्या माध्यमातून शहरातील पथविक्रेत्यांचे हक्क आणि व्यापार यांचे संरक्षण केले जाते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पथविक्रेता धोरणानुसार सावंतवाडी शहरातील पथविक्रेता समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत नाझिया डिसूझा यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल सावंतवाडी येथील गुरुकुल मध्ये सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी मनोज घाटकर, दीपक सावंत, भाजप अल्पसंख्याक उपजिल्हाध्यक्ष ड्यूमिंग अल्मेडा, राजा शिवाजी चौक समितीचे उपाध्यक्ष दिलीप पवार, मायकल माडतीस, श्रीयुत सांगेलकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते
.


