न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आजगाव मायनिंग विरोधी आंदोलनाला मनसेचा पूर्ण पाठिंबा, ॲड. अनिल केसरकर

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

आजगाव ग्रामस्थांच्या मायनिंग विरोधी आंदोलनाला मनसेचा पूर्ण पाठिंबा आहे. मनसेचे वरिष्ठ नेते लवकरच आंदोलकांच्या भेटीला येणार आहेत अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिली
आजगाव व आसपासच्या गावांमध्ये जे एस डब्लू कंपनीच्या मार्फत मायनिंग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच प्राथमिक भाग म्हणून नेमका भूभाग अधोरेखित व्हावा यासाठी व मायनिंगची खोली कळावी या उद्देशाने कंपनीने ड्रोन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक आजगाव व आसपासच्या परिसरात ड्रोन सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिकृत ठराव मंजूर करण्यात आला आहे, हि बाब अतिशय गंभीर आहे. आजच्या घडीला जिल्हा परिषद शिवसेना भाजपा युतीच्या ताब्यात आहे, मग ज्यावेळी हा ठराव मंजूर करण्यात आला तेव्हा या दोन्ही पक्षांचे सदस्य तोंड बंद करून का बसले होते याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. असे श्री. केसरकर म्हणाले. राज्यात व केंद्रात याच दोन्ही पक्षांचे सरकार सत्तेवर आहे. आजगाव, धाकोरे, मातोंड व अन्य निसर्गाने समृद्ध असलेल्या गावांमध्ये एखादा प्रदुषणकारी प्रकल्प येत आहे याची साधी माहिती या सत्ताधाऱ्यांना नसणे हे हास्यास्पद आहे. कोणता प्रकल्प कोणत्या भागात येणार आहे याची पूर्ण कल्पना असलेली हि सत्ताधारी मंडळी लगेचच आपल्या बगलबच्यांमार्फत प्रकल्पाच्या आसपासच्या जमिनी खरेदी करायला सुरुवात करतात. आजगावच्या बाबतीत देखील हेच झालेल आहे. सत्ताधारी पक्षाच्या मंडळींमध्ये जर हिम्मत असेल तर गावात जावून नौटंकी करण्यापेक्षा सत्तेचा वापर करून हा प्रदूषणकारी प्रकल्प रद्द करा असे आवाहन मनसे तर्फे श्री. केसरकर यांनी केले आहे.
कळणे मायनिग सुरू करण्यात आले त्यावेळी देखील काही ठरावीक मंडळी या आंदोलनाचे नेतृत्व करत होती. हे आंदोलन स्थानिक ग्रामस्थांच्या हातातून केव्हा निसटले हे त्यांना पण समजले नाही. त्यामुळे या अनुभवातून शहाणे होऊन पुन्हा याची पुनरावृत्ती आपल्या गावात होणार नाही याची दक्षता घेवून हे आंदोलन शेवट पर्यंत स्थानिक ग्रामस्थांच्या हातात राहील याची काळजी घ्यावी असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केले आहे.
दरम्यान या मायनिंग विरोधी लढ्यात मनसे पूर्ण ताकदीनिशी ग्रामस्थांच्या पाठीशी असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसेचे वरिष्ठ नेते लवकरच ग्रामस्थांच्या भेटीसाठी येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे