न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोल्हापूर रामघाट दोडामार्ग असनोडा राज्यमार्गाचे काम निकृष्ट, आमदार केसरकर यांची तक्रार

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

आमदार दीपक केसरकर यांनी नुकतीच दोडामार्ग तालुक्याला भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी करून आढावा घेतला होता. राज्य शासनाच्या रस्ते विकास महामंडळ (MSIDC) योजने अंतर्गत कोल्हापूर नागणवाडी चंदगड रामघाट दोडामार्ग असनोडा राज्यमार्ग क्रमांक 189 किमी 0/100 ते किमी 3/00 तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग या ईपीसी मॉडेल अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता रस्त्याच्या काही भागाचे निकृष्ट काम केल्याचे निदर्शनास आले. त्या संदर्भात MSIDC चे मुख्य अभियंता श्री. रणजित हांडे यांची मुंबई येथे भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्य अभियंता श्री. रणजीत हांडे यांनी पुढील आठवड्यात या भागाचा दौरा करून तक्रारीच्या अनुषंगाने सदर कामांची पाहणी पाहणी करून उचित करावी करण्याचे आश्वासन दिले. श्री . हांडे पुढील आठवड्यात या भागाचा दौरा करून पाहणी करणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे