न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जनगणनेच्या कामाचा श्रमपरिहार करून घरी जाणा-या दोन शिक्षकांचा अपघातात मृत्यू

हिंगोली/

हिंगोली-रिसोड राज्यमार्गावर एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना समोर आली आहे. पिकअप आणि बुलेट यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सेनगाव शहराजवळ हा अपघात घडला असून, गजानन पत्की आणि संतोष देसाई अशी मृत्यू झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. हे दोन्ही शिक्षक दारूच्या नशेत तर्र असल्याचे प्राथमिक वृत्त असून, या भीषण घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत आणि शिक्षकांच्या मूळ गावावर शोककळा पसरली आहे.”
मृत्यू झालेले दोन्ही शिक्षक हिंगोली जिल्ह्यातील वरुड चक्रपान या गावातील रहिवासी होते. शासकीय कर्तव्यावर असताना, जनगणनेचे काम आटोपून ते दोघे बुलेटने रिसोड येथे आपल्या पाहुण्यांकडे गेले होते. पाहुण्यांकडील पाहुणचार घेऊन ते रात्रीच्या सुमारास परतीच्या प्रवासाला निघाले. दरम्यान, सेनगाव शहराच्या जवळ येत असताना एका भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या बुलेटला जोरदार धडक दिली.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे