न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आडाळी उत्खननामागे आमदार केसरकर, उबाठा शिवसेनेच्या रुपेश राऊळांचा आरोप

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी येथील करोडो रुपयांच्या खनिज सदृश्य माती चोरीप्रकरणाचे प्रमुख सूत्रधार हे माजी मंत्री आमदार दिपक केसरकरच आहेत. त्यांच्याच मर्जीने हे प्रकार होत आहेत असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख श्री. रूपेश राऊळ यांनी केला. आज शनिवारी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख राजू शेटकर, विलास गावडे, प्रशांत कुबडे विनोद ठाकूर आदी उपस्थित होते.
आडाळी प्रकल्पातील खनिज सदृश्य माती चोरीस गेल्याचे उघड झाले असून जवळपास कोट्यावधी रुपयांची उलाढाल संगनमताने करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी या प्रकरणात आवाज उठवला. मात्र, फक्त तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक हे एवढे मोठे प्रकरण करू शकत नाही. उत्खनन वाहतूक ते नेऊन विकणे यामागे फक्त प्रशासन नसून मोठी राजकीय शक्ती आहे. परब हे कदाचित आमदार दीपक केसरकर यांचे नाव घेण्यास घाबरले असतील असा टिका श्री. रूपेश राऊळ यांनी केली आहे.
सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे होत असल्याचे खुद्द शिवसेना पक्षाचे आमदार निलेश राणे सांगत आहेत. मात्र, या प्रकरणातील नाव घेण्यास जिल्हाप्रमुख संजू परब घाबरत असतील. माती चोरी प्रकरणाशी केसरकर यांचा थेट संबंध असून त्यांची व एमआयडीसी अधिकारी यांची पहिली नार्को टेस्ट करा, संपूर्ण सत्य बाहेर येईल असे श्री. राऊळ यांनी सांगितले.
या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई न झाल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उबाठा ठाकरे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे