पुण्यातील आयटी कंपनी रातोरात बंद… ७०० कर्मचाऱ्यांवर बेकारी
पुणे/
पुण्याचे आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. हिंजवडी फेज-२ मधील ‘थिंक टेक्नॉलॉजी इंडिया’ ही आयटी कंपनी अचानक रातोरात बंद झाली आहे.
‘थिंक टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीने कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट कार्यालयाला टाळे ठोकल्यामुळे, तब्बल ७०० हून अधिक सॉफ्टवेअर इंजिनियर्स आणि फ्रेशर्सवर अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.”
“मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार थकवत होती. आर्थिक विवंचनेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने जे Cheques दिले होते, ते देखील बँकेत बाऊन्स झाले आहेत. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या कर्मचाऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. पुण्यातील शेकडो इंजिनिअर एका रात्री बेरोजगार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.”


