उत्तर गोव्यातील रेवोड्यात गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर
म्हापसा/ प्रतिनिधी
उत्तर गोव्यात गवाच्या हल्ल्यात महिला जखमी झाल्याची घटना आज (रविवारी) सकाळी साडेसात वाजता रेवोडा येथे घडली. यात सिंथिया फर्नांडिस या जखमी झाल्यात .त्यांना म्हापसा जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी कि. सिंथिया या आपल्या घराबाहेर कुत्र्याला फिरविण्यासाठी आल्या होत्या. त्याच वेळी पाठिमागून गव्याने हल्ला केला. या वेळी त्यांच्या कुत्र्याने मोठ्याने भुंकण्यास सुरुवात केली. त्यामुळे घरातील लोक बाहेर आले. त्यांना पाहताच गव्याने पलायन केले. जखमी फर्नांडिस यांना लागलीच म्हापसा जिल्हा रूग्णालयात दाखल केले.


