न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी गॅस कंपनीचे काम पाडले बंद

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

जोपर्यंत मागच काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढे काम करू देणार नाही असा इशारा आज शुक्रवारी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला देत मोती तलाव भागात सुरू असणारे काम बंद पाडले. सालईवाडा भागातील ३ महिन्यांपासून खणून ठेवलेले रस्ते आधी सुस्थितीत आणा, तोवर गॅस पाईप लाईनचे पुढचे काम करू देणार नाही असा इशारा श्री. सुर्याजी यांनी दिला.
नगरसेवक श्री. सुर्याजी यांनी एमएनजीएल अधिकाऱ्यांना सोबत घेत येथील निंबाळकर पीर, कामत नगर, कळसुलकर स्कुल, दैवज्ञ मंदिर ते युको बँक परिसरातील झालेली रस्त्यांची दुरवस्था दाखवून दिली. चुकीच्या पद्धतीने रस्ते बुजविण्यात आल्याने लोकांना चालण मुश्किल झाले आहे. रस्ते अरुंद असल्याने महिलांचे अपघात होत आहेत. त्यामुळे तातडीने रस्तावरील मातीचे ढीग रस्त्याच्या समांतर आणावे, मातीने बुजवलेले गटार सुस्थितीत आणून डांबरीकरण होईपर्यंत रस्त्यावर पाणी मारावे अशा सुचना त्यांना केल्या.
यावेळी न.प.कडे खडीकरण व डांबरीकरणासाठीचे पैसे कंपनीकडून वर्ग करण्यात आले आहेत‌‌. ते काम नगरपरिषदकडून करण्यात येणार आहे. तर गॅस पाईपलाईनचे कंम्पलिवशन सर्टिफिकेट आज देण्यात येईल असे सांगितले. यावेळी नगरसेवक श्री. सुर्याजी यांनी मुख्याधिकारी यांना फोन करत खडेबोल सुनावले. जोपर्यंत खोदून ठेवलेले मार्ग सुस्थितीत आणले जात नाही, तोवर गॅस पाईपलाईनचे पुढील काम करू देणार नाही असा इशारा दिला. यावेळी मुख्याधिकारी यांनी आधी काम पूर्ण करा, नंतर पुढील काम सुरू करा असे आदेश फोनवरून कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मेहर पडते, ॲड. प्रथमेश प्रभू, श्री. सावंत आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे