न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून सामाजिक बांधिलकीला एक लाखाची देणगी

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याला एक लाख रुपयाची मदत केली आहे. सावंतवाडी शहरातील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान एक निस्वार्थी सेवाभावी कार्याची ओळख बनली आहे. ज्याची दखल प्रतिष्ठित व्यक्ती तसेच वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा घेतली जात आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला विनोद राऊळ यांच्यामार्फत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी एक लाख रुपयांची देणगी दिली. संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे व उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक यांच्या जवळ ही देणगी विनोद राऊत यांनी सुपूर्त केली. याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनोदजी राऊळ, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे, उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीच्या सर्व सदस्यांनी रवींद्र चव्हाण तसेच विनोद राऊळ यांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे