तन्मय दळवी याच्या शस्त्रक्रियेला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून २०००० रुपयांची मदत
सिंधुदुर्ग /राजू तावडे
एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेला कु.तन्मय दळवी वय वर्ष 9 याच्या मुंबई वाडिया हॉस्पिटल परेल येथे दिनांक 27 रोजी होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून 20 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
तसेच गांधी चौक येथील श्री गणेश स्टोअर्स किराणा मालाचे व्यापारी श्री. जयप्रकाश बांदेकर यांच्याकडूनही मदतीचा हात मिळाला आहे.
समाजामध्ये वावरत असताना सामाजिक भान राखून व सामाजिक बांधिलकी जपून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्मिळ आजार असलेल्या अशा अनेक मुलांना मदतीचा हात दिला आहे. त्या मुलांवर यशस्वी रित्या शस्त्रक्रिया झाल्याचे समाधान मिळत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे म्हणाले. आजतगायत अनेक रुग्णांचे प्राण वाचण्याचे हि भाग्य सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्याला लाभले आहेत असे ते म्हणाले.
दळवी कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे आभार मानले आहेत. याप्रसंगी छोटा तन्मय त्याचे आई-वडील तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे, भास्कर साधले, शरदिनी बागवे, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.


