जालन्यातील कापड दुकानात आढळल्या २१ तलवारी
जालना/
जालना शहरातील एका कापड दुकानातून तब्बल 21 धारदार तलवारींचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. जालना येथील सदर बाजार पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली.या प्रकरणी मनीष निहलानी या कापड दुकानदाराच्या विरोधात जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना शहरातील महावीर चौक परिसरातील एका कापड दुकानात मोठ्या प्रमाणावर तलवारींचा साठा असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित दुकानावर छापा टाकला. दरम्यान या कापड व्यावसायिकाने तलवारी नेमकी कशासाठी आणल्या होत्या याचा तपास पोलीस करत आहे.”


