“इथेनॉलने भरलेला टँकर करूळ घाटात पलटी… चालक गंभीर
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
“इथेनॉलने भरलेला टँकर करूळ घाटात पलटी झाला. या अपघातात केबिनमध्ये अडकलेल्या चालकास वैभववाडी पोलिसांनी बाहेर काढले. त्याच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इथेनॉलने भरलेला हा टँकर वारणा येथून गोव्याकडे जात होता. गगनबावडा पासून काही अंतरावर करून घाटात चालकाचा ताबा सुटल्याने टँकर डोंगराकडील बाजूला गटारात पलटी झाला. या अपघातात टँकरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातात चालकाचा पाय स्टेअरिंग खाली अडकला होता. चालकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी गगनबावडा व वैभववाडी पोलीसांनी शर्तीचे प्रयत्न करून क्रेनच्या मदतीने त्याला बाहेर काढले. टँकरमध्ये असलेल्या ज्वालाग्राही पदार्थामुळे दुर्घटना घडू नये. याची खबरदारी म्हणून फायर ब्रीगेडची गाडी ही दाखल झाली होती.”


