मतदारसंघातील रिक्त वैद्यकीय पदे भरण्यासाठीआमदार दीपक केसरकर यांची आरोग्य मंत्री आबिटकर यांच्याशी चर्चा
सिंधुदूर्ग/ राजू तावडे
आमदार दीपक केसरकर यांनी आज मंगळवारी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री ना. श्री. प्रकाश आबिटकर यांची त्यांच्या सुरुची या निवासस्थानी भेट घेऊन मतदार संघातील आरोग्य विषयक बाबींवर चर्चा केली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पदे (डॉक्टर ) मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. सदरची पदे तातडीने भरण्यासंदर्भात मागणी केली. तसेच उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे डायलिसिस यंत्र उपलब्ध करून देणे बाबतही मागणी केली.
मंत्री प्रकाश आबिटकर यांनी रिक्त सर्व पदे लवकरात लवकर भरण्यात येतील व डायलिसिस यंत्रणा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन आमदार दीपक केसरकर यांना दिले.
तसेच उपजिल्हा रुग्णालय जागेचा प्रश्न आता मिटला असून उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर होण्यासाठी पुढील आवश्यक ती कार्यवाही विभागाकडून लवकर होणे बाबत विनंती केली. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सिंधुदुर्ग श्री. सचिन वालावलकर उपस्थित होते.


