न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पालकमंत्र्यांनी दखल घेताच सावंतवाडी एसटी डेपोतील खड्डे तत्काळ बुजवले  

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

   सावंतवाडी येथील एसटी बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आणि नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसाच्या दिवसांत या खड्ड्यांमध्ये पाण्याचे डबके साचून चिखल होत होता. एसटी बस स्थानकात येताना किंवा तिथून बाहेर पडताना आजूबाजूने जाणाऱ्या गाड्यांमुळे खड्ड्यातील साचलेले दूषित पाणी आणि चिखल थेट प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याने नागरिक व प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत होते.

या गंभीर समस्येबाबतची माहिती मिळताच पालकमंत्री नितेश राणे यांनी या विषयाची तात्काळ दखल घेतली. त्यांनी एसटी प्रशासनाला सावंतवाडी डेपो परिसरातील हे खड्डे तात्काळ बुजवून रस्ता पूर्ववत करण्याचे कडक निर्देश दिले होते.

पालकमंत्र्यांच्या या सूचनेनंतर एसटी प्रशासनाने तातडीने हालचाली करत मंगळवारी सावंतवाडी एसटी डेपो परिसरातील सर्व खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण केले. हे काम मजबूत आणि टिकणारे व्हावे यासाठी एसटी प्रशासनाच्या वतीने सिमेंट काँक्रीटचा वापर करून खड्डे बुजवण्यात आले आहेत. खड्डे बुजवल्यामुळे आता बसस्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत झाली असून प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

पालकमंत्र्यांच्या तत्परतेमुळे आणि एसटी प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईमुळे सावंतवाडीतील प्रवासी व स्थानिक नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे