भडगाव पुल खचला… गडहिंग्लज नेसरी वाहतूक बंद
कोल्हापूर/ प्रतिनिधी
जिल्ह्यात मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यातच गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील पर्यायी पुल खचल्याने गडहिंग्लज नेसरी मार्ग पुर्णपणे बंद झाला असून वाहतूक आजरा मार्गे वळविण्यात आली आहे.
चंदगड नेसरी गडहिंग्लज असा क्रॉंकिटचा रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे तर काही ठिकाणी पुलाची कामे सुरू असल्याने पर्यायी पुलाचा मार्ग सुरू केला आहे. त्यातील भडगावचा पुल खचला.यामुळे नागरीकांना आजरा मार्गे नेसरी, चंदगड, बेळगांव जाण्याची वेळ आली आहे.
सुचना: बातमी छाया प्रतिकात्मक


