न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोल्हापूरातील पाच बंधारे पाण्याखाली… वाहतूक बंद

कोल्हापूर/ प्रतिनिधी 

पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम होऊ लागला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून त्यांच्या पाणीपातळीत वाढ होतेय. अनेक ठिकाणी नदीचं पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्याने प्रशासन सतर्क झालंय. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेल्याने काही महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलीय. तिथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आज घडीस इचलकरंजी, रुई, शिंगणापूर, यवलुज आणि शिरोळ इथले बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. या बंधाऱ्यांवरून दररोज मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांची आणि वाहनांची ये-जा होत असते. मात्र पाण्याचा वेग वाढल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने या मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी विविध ठिकाणी तैनात करण्यात आलेत.

दरम्यान  आज कोल्हापूर शहरातील राजाराम बंधा-यावर पाणी आले. त्या पाण्यातही दुचाकीस्वार गाडी घालण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर नागरीकांनी त्यास मज्जाव केल्याने तो माघारी फिरला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे