न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दुचाकीसमोर अचानक ह वाहन टाकून पळाले, पण हत्तीने पाठलाग करून जीवच घेतला

चंद्रपूर/ वृत्तसंस्था

सावली तालुक्यात रानटी हत्तींच्या वाढत्या वावराने आणखी एका नागरिकाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्याहाड येथील अतुल गोहने दुचाकीवरुन सोनापूरकडे जात असताना व्याहाड–सोनापूर मार्गावर त्यांच्या दुचाकीसमोर अचानक रानटी हत्ती आल्याचं सांगितलं जात आहे. समोर हत्ती दिसताच त्यांनी प्रसंगावधान राखत दुचाकी रस्त्यावरच सोडली आणि जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र संतप्त हत्तीने त्यांचा पाठलाग करून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या भीषण हल्ल्यात अतुल गोहने यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण सावली तालुक्यात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

 

 

टीप: बातमी छायाचित्र प्रतिकात्मक 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे