करूळ घाटात दरड कोसळली तर आकेरीतील वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला
सिंधुदुर्ग / राजू तावडे
मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. आज दुपारी १२च्या सुमारास विजयदुर्ग कोल्हापूर महामार्गावरील करूळ घाटात दरड कोसळली.त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली.
दरम्यान काल गुरे चरण्यासाठी गेलेल्या आणि ओढ्यात वाहून गेलेल्या आकेरीतील गणेश पुंडलिक पालव यांचा मृतदेह सकाळी सापडला. त्या बाबतची नोंद आपत्ती व्यवस्थापनाकडे करण्यात आली आहे.
आज पावसाचा ओघ कमी आहे. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक १११ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे तिलारी पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली होती.


