राम मंदीर मधील चोरलेला पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला : उध्दव ठाकरे
मुंबई / वृत्तसंस्था
राम मंदिराचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जात आहे. अब हिंदू मार नही खायेगा असं वाजपेयी म्हणाले होते. आता मी म्हणीन हिंदू माफ नही करेगा. त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करणार आहोत. दादरमध्ये मारुतीच मंदिर आहे तिथे चारच्या सुमारास जमणार आहोत. राम रक्षा आंदोलन सुरु करणार आहोत” अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. आज राम मंदिर वेगळ्या गोष्टीने चर्चिला जात आहे. दरोडेखोरी सुरू आहे. आमदार खासदार फोडले जात आहे. त्याला ऑपरेशन नाव दिलं जात आहे. आता ऑपरेशन राम मंदिर भाजप करत आहे का. या बातम्या दाखवल्या जात असतील नसतील. पण चोरी होत आहे. राम मंदिरावर दरोडा टाकला जात आहे. काहींच्या मते हा चोरीचा पक्ष इतर पक्ष फोडण्यासाठी केला जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या या नवीन दाव्याने खळबळ उडाली आहे.
राम मंदिर दानपेटीतील या चोरीविरोधात उद्धव सेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारी संध्याकाळी ५ वाजता दादर कबुतरखान्याजवळ राम मंदिर आहे. तिथे तमाम हिंदूंना ज्यांना ज्यांना वाटतं भाजपच्या कालखंडात हिंदुत्व धोक्यात आलं म्हणून मोर्चे काढले त्यांना आमंत्रित करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी राम भक्त आणि हिंदूंना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले.
ज्यांनी हिंदुत्व सोडंल नाही, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही. त्यांनी यावं. त्यांचं स्वागत करतो असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तर अयोध्येत जाऊन आंदोलन करायला लाजत नाही. महाराष्ट्र जागा झाला की देश जागा होतो असे ते म्हणाले. आता उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन आंदोलन करणार का, याची चर्चा होत आहे.
उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत भाजपावर मोठा आरोप केला आहे. राम मंदिरातील दानपेटीतून कोट्यवधींचे दान चोरीला गेले आहे. त्यात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ट्रस्टचे प्रमुख चंपत राय हे बाजूला झालेले आहेत. राम मंदिरातील या चोरीविरोधात उद्धव ठाकरे यांनी एल्गार पुकारतानाच चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
आम्ही राम रक्षा आंदोलन करत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पूर्वी महाआरती करत होतो, हिंदूंना जागं करण्यासाठी. आता हिंदू जागे झाले आहेत, हिंदू आता जाब विचारतील. जाब विचारण्यासाठी राम रक्षा म्हणू, हनुमान चालिसा आणि हनुमान स्तोत्रही म्हणू, असं त्यांनी नमूद केलं. रविवारी होणारा कार्यक्रम ही फक्त सुरूवात आहे, त्यानंतर प्रत्येक ठिकाणी, राज्यभर, जिल्हा पातळीवर शहरात आणि खेड्यात राम मंदिर आणि हनुमान मंदिर असेल तिथे राम भक्त आंदोलन करतील. वारी सुरू होतेय. वारकरीही एकत्र येऊन भाजपला उत्तरदायित्व स्वीकारायला लावल्याशिवाय राहणार नाही. मी सर्व हिंदू आणि राम भक्तांना आमंत्रत करत आहोत. हिंदुत्वाच्या नावाने होणारी लूट सहन केली जाणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.


