न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

हॉटेलच्या आगीत 21 जण दगावले; गाद्या टाकून 8 जणांना वाचवणारे रियाजुद्दीन अडचणीत

दिल्ली/

दिल्लीतील मालवीय नगरात बुधवारी हॉटेलला लागलेल्या आगीत २१ जणांचा करुण अंत झाला. यातील ११ जण परदेश नागरिक होते. मृतांचा आकडा वाढण्याची भीती होती. पण स्थानिकांनी केलेल्या मदतीमुळे बऱ्याच जणांचे प्राण वाचले. हॉटेलच्या जवळच असलेल्या रियाझुद्दीन यांनी मागचा पुढचा विचार न करता त्यांच्या दुकानातील गाद्या रस्त्यावर अंथरल्या. हॉटेलच्या आगीमुळे वरच्या मजल्यांवर अडकलेल्या लोकांनी या गाद्यांवर उड्या मारल्या. त्यामुळे ८ जणांचा जीव वाचला. दुकानातील गाद्या लोकांच्या कामी आल्याबद्दल रियाजुद्दीन यांनी समाधान व्यक्त केलं.

हॉटेल समोर रियाजुद्दीन आणि त्यांचे पुत्र अरमान मंसुरी यांचं गाद्यांचं दुकान आहे. आग लागल्यावर अनेकांनी हॉटेलच्या वरच्या मजल्यांवरून खाली उडी मारण्याची तयारी सुरू केली. पण खाली पडल्यावर त्यांना गंभीर दुखापत होण्याची दाट शक्यता होती. हा धोका लक्षात घेता रियाजुद्दीन आणि त्यांच्या मुलानं समयसूचकता दाखवत दुकानातील गाद्या रस्त्यावर अंथरल्या. त्यामुळे ८ जणांचा जीव वाचला. पण यामुळे रियाजुद्दीन यांचं जवळपास दीड ते दोन लाख रुपयांचं नुकसान झालं.

बचाव कार्यासाठी आम्ही दुकानातील बरंच सामान वापरलं. यामुळे व्यवसायाचं बरंच नुकसान झालं. पण अद्याप तरी प्रशासनातील कोणीही नुकसान भरपाई देण्यासाठी समोर आलं नसल्याची खंत रियाजुद्दीन यांनी बोलून दाखवली. रियाजुद्दीन यांनी हॉटेलच्या आगीत मरण पावलेल्यांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्या दुकानातील चादरी, पांघरुणं दिली. आमच्या दुकानातील सामान लोकांच्या कामी आल्याचा अभिमान असल्याचं रियाजुद्दीन यांचे पुत्र अरमान यांनी सांगितलं.

आम्हाला झालेला तोटा सहा महिने, वर्षभरात भरुन निघेल. आमचं दीड ते दोन लाखांचं नुकसान झालं आहे. पण त्या सामानामुळे अनेकांचे जीव वाचले. त्यापुढे ही रक्कम काहीच नाही,’ अशा भावना अरमान यांनी व्यक्त केल्या. तुम्हाला झालेलं नुकसान भरुन देण्यासाठी कोणी संपर्क केला होता का, असा प्रश्न त्यांना विचारला असता, स्थानिक आमदार सतीश उपाध्याय आले होते. त्यांनी कौतुक केलं. तुम्हाला मदत करण्यासाठी प्रयत्न करू, असं आश्वासन देऊन ते निघून गेले, असं अरमान यांनी सांगितलं.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे