न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग भाजपाचा ‘आशीर्वाद का दिया’ उपक्रम

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने ‘सेवा के 25 वर्ष’ या उपक्रमांतर्गत ‘आशीर्वाद का दिया’ हा विशेष कार्यक्रम जिल्हाभरात उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ सेवेला अभिवादन करत सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात आले. विविध भागांतील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

‘आशीर्वाद का दिया’ या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत सेवा आणि सामाजिक सहभागाची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाला मिळालेल्या गतीचा उल्लेख करत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा उपक्रमांच्या माध्यमातून हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर, भाजपा युवानेते विशाल परब, बांदा मंडल अध्यक्ष मधू देसाई, बांदा सरपंच सौ. प्रियांका नाईक, प्रविण देसाई, विनेश दळवी, उमेश पेडणेकर, बाळू सावंत, गुरुनाथ पेडणेकर, सौ. रुपाली शिरसाठ आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या या उपक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे