न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

लावण्यसिंधू लोककला व चित्रपट सहकारी संस्थेची 19 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी

 

सिंधुदुर्ग  / राजू तावडे 

   लावण्यसिंधू लोककला व चित्रपट सहकारी संस्थेची 19 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 20/9/2026 रोजी दुपारी ठिक 3.00 वाजता श्री. भवानी सभागृह, तेलीआळी, कणकवली येथे आयोजित करणेत आली आहे.

सदरील सभेत दि. 31/3/2026 अखेर जमा -खर्च, नफा – तोटा पत्रक व ताळेबंद मंजूर करण्यात येईल. तसेच कोकणातील पारंपारीक फुगडी व होळी सणातील घुमटवादन, फाग, व राधानृत्य लोककलांचा समावेश शासन निर्णयात व्हावा तसेच त्यांना मानधन मिळावे आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील मानधन कलाकारांच्या संख्येची मर्यादा वाढविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणे, नवीन कलाकारांना संस्थेच्या कार्यात सहभागी करून घेणे व कलाकारांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे इत्यादी विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत.तरी सभासदांनी व इच्छुक कलाकारांनी सभेस उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर, उपाध्यक्षा सौ. अक्षता कांबळी व सचिव श्री. नितीन तळेकर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे