न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्गचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रकाश कवठणकर यांचे निधन

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी

 कवठणी गावचे सुपुत्र, सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रकाश श्रीधर कवठणकर (वय ६५) यांचे शनिवारी (१ ऑगस्ट) सकाळी ११.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

प्रकाश कवठणकर यांनी आपल्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीत शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. सर्वसामान्य नागरिकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, विकासकामांप्रती असलेली तळमळ आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळे त्यांनी जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या निधनामुळे कवठणीसह संपूर्ण सावंतवाडी तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे