न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६ स्पर्धेचा उद्या विशाल परब यांच्याहस्ते शुभारंभ ….

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

    आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६ स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून उद्या, रविवार दि.२ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता या भव्य स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम आंबोली-सांगेली, सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि विशाल सेवा फाउंडेशनच्या प्रायोजकत्वाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ भाजप युवानेते तथा विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक विशाल परब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात येणार आहे. स्पर्धा १८ कि.मी., १० कि.मी. आणि ५ कि.मी. अशा तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास एक हजार स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने आंबोली येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक व क्रीडाप्रेमी उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेबाबत बोलताना श्री. विशाल परब म्हणाले, आंबोली सारख्या निसर्गरम्य पर्यटन स्थळाला अशा उपक्रमांमुळे अधिक प्रसिद्धी मिळेल. पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, नियमित व्यायाम व धावण्याची सवय लावावी, हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे. विशाल परब आणि सौ. वेदिका परब या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही श्री. परब यांनी केले.

आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात होणाऱ्या या मॅरेथॉनमुळे क्रीडा, पर्यटन आणि आरोग्य जनजागृतीला मोठी चालना मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे