बीडमध्ये चालती कारला आग… कार जळून खाक…
बीड/
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील डॉ. भारत मेंगडे व डॉ. प्रतिभा मेंगडे हे आज रविवारी सकाळी सव्वा ६ वाजण्याच्या सुमारास बोरखेड येथील शेतात बोअरवेल गाड्या आल्याने शेताकडे निघाले होते. महाजनवाडी फाट्यावर त्यांच्या व्हिस्टा इंडीका (एमएच २३ वाय २३२१) या कारमधून अचानक धूर निघू लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ गाडी थांबवून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. क्षणातच गाडीने पेट घेतला. वायर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.


