न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

रंगभूमी दिनानिमित्त गुरुवारी सावंतवाडीत ज्येष्ठ रंगकर्मींचा रंगतदार सत्कार समारंभ; सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनचा उपक्रम

सिंधुदुर्ग  राजू तावडे

मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्या वतीने सावंतवाडीतील ज्येष्ठ व मानाच्या रंगकर्मींचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा (उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे) ‘वटसावित्री कला क्रीडा मंडळाच्या’ सभागृहात पार पडणार आहे.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक नगरसेवक सच्चिदानंद उर्फ संजू परब, नगरसेविका सौ. स्नेहा नाईक, सामाजिक कार्यकर्त्या सौ. संजना परब, सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

रंगभूमीच्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक व नाट्य कलाकार शंभू पावसकर, माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, नाट्यकर्मी जनार्दन पोकळे आणि इतरही अनेक ज्येष्ठ कलावंतांचा सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास सावंतवाडी व परिसरातील सर्व नाट्यरसिक प्रेक्षकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आग्रहाचे आवाहन सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनचे अध्यक्ष नरेंद्र देशपांडे, भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, उपाध्यक्ष पृथ्वीराज प्रताप, सचिव सौ. प्रतिभा चव्हाण, खजिनदार सुनील राऊळ, हिशोब तपासनीस कौस्तुभ पेडणेकर, सदस्यत्व नोंदणी संचालक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, क्लब विस्तार संचालिका सौ. स्मिता केंकरे, कार्यक्रम संचालिका ॲड. सौ. सिद्धी परब, जनसंपर्क अधिकारी दादा मडकईकर, संचालक आशुतोष चिटणीस, संचालिका डॉ. सोनल लेले आणि सम्राट क्लबचे सर्व सदस्य यांच्यावतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे