न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कडून होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

 

सिंधुदुर्ग  राजू तावडे

   सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने आरोग्य क्षेत्राबरोबरच आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य सुरू केले आहे. सावंतवाडी तालुक्यातील मराठी शाळांना भेट देऊन त्या शाळेमधील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेटवस्तू सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा माध्यमातून दिल्या जातात. सावंतवाडी शहरातील तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये हा उपक्रम राबवला जातो. सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 5 या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्या बरोबरच बसण्यासाठी चटई देण्यात आल्या. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे, हेलन निबरे यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी शाळेतील शिक्षिका संगीता भिरवंडेकर, शुभलता सुखी यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार मानते. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे शरदिनी बागवे, हेलन निबरे, उपाध्यक्ष विजय वाडकर व शाळेच्या शिक्षिका उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे