न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी पोलिसांकडून ६२.९८ लाखाची दारू जप्त; चार जणांवर गुन्हा दाखल

 

सिंधुदुर्ग राजू तावडे

सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा चेकपोस्टवर सावंतवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोव्यातून बेकायदेशीरपणे महाराष्ट्रात आणली जाणारी तब्बल ४२ लाख ९८ हजार ४०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि २० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ६२ लाख ९८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास सातार्डा चेकपोस्टवर ही कारवाई करण्यात आली. आरोपी भास्करप्रदिप रामाराव त्रिमलशेटी (रा. आंध्रप्रदेश) हा त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पोमध्ये (क्र. AP-39-WF-2121) आरोपी व्यंकटनागरान गोपाळकृष्ण बालम (रा. आंध्रप्रदेश) याच्यासह बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या दारूचा साठा घेऊन सातार्डा-मळेवाड दिशेकडे जात होता.
टेम्पोची झडती घेतली असता, त्याच्या पाठीमागील हौदात ‘Royal Blue Whisky’ असे लेबल असलेल्या १८० मि.ली. मापाच्या प्लॅस्टिकच्या कंपनीसिलबंद बाटल्यांचे एकूण ५९७ बॉक्स (प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या) मिळून आले. हा बेकायदेशीर दारूचा साठा टेम्पो मालक आरोपी बॉबी पडाला आणि निरंजन आनंद नाईक (रा. आरोस) यांच्याशी संगनमत करून वाहतूक केला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५(अ)(ई), ८१, ८३ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. हिंगे, तसेच पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला असून पुढील तपास श्री. हिंगे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे