इलेक्ट्रिक स्कुटी चार्ज करताना ठिणग्या उडाल्या…. बिल्डिंगलाच आग लागून २ जणांचा मृत्यू
नोएडा /वृत्तसंस्था
नोएडा फेज-३ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मामुरा गावातील एका ५ मजली इमारतीला भीषण आग लागली. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून, काही लोक अजूनही आत अडकले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्याद्वारे सुमारे ५० जणांची सुटका केली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी बचावकार्य सुरू केले. दरम्यान पोलिसांनी या पाच मजली इमारतीच्या मालकाला ताब्यात घेतलंय.”
इलेक्ट्रिक बाईकमधून उडालेल्या ठिणगीमुळे इमारत आगीच्या भक्षस्थानी पडली असावी, हे कारण सांगितलं जातंय. इमारतीच्या आत पार्क केलेल्या एका इलेक्ट्रिक बाईकमधून अचानक ठिणग्या उडू लागल्या आणि त्यानंतर आगीने संपूर्ण परिसराला वेगाने आपल्या विळख्यात घेतले. दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचे खरे कारण अजूनही समोर आले नाहीये. या घटनेप्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.”


