न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी शहरात चोरट्यांनी ६ दुकाने फोडून फक्त सात हजार रुपयांचा ऐवज लंपास

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी शहरात रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी नगरपरिषद इंदिरा कॉम्प्लेक्समधील दुकानांना लक्ष्य करून चोरीचा प्रयत्न केला. साधारण पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एकूण ६ दुकान गाळ्यांचे लॉक तोडले, तर आणखी ४ दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेत एका दुकानातून ५ हजार रुपये तर एका बेकरीतून २ हजार रुपये असा एकूण ७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. पहाटेच्या शांततेचा फायदा घेत चोरट्यांनी हे कृत्य केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक सरदार पाटील यांच्यासह हवालदार श्री. शिंगाडे, सर. शिंदे, श्री. धोत्रे यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी श्वान पथक व फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले.
दरम्यान, परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच आरोपींचा छडा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पहाटेच्या या धाडसी चोरीमुळे सावंतवाडीत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून व्यापाऱ्यांनी अधिक कडक बंदोबस्ताची मागणी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे