न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सोमवारी बांदा येथील श्री देव बनखनकर देवस्थानकडे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन

सिंधुदुर्ग / राजू तावडे

बांदा काळसेवाडी येथील जागृत देवस्थान श्री देव बनखनकर येथे सोमवार दिनांक ६ एप्रिल रोजी सकाळी ९.०० वाजता श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ९.०० वाजता महापूजेला आरंभ होईल. त्यानंतर दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. सायंकाळी ६.३० वाजता बांदा येथील महिला मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री ८.०० वाजता साटेलेली येथील माऊली भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. तरी सर्व भाविकांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव बनखनकर सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसेवाडी, सुतारवाडी बांदा यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे