न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बाजारपेठेतील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत नगरसेवक देव्या सुर्याजींची नाराजी

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडीत बाजारपेठेतील बंद अवस्थेत असणारे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यासाठी पोलिसांनी गांभीर्याने बघितले नाही, अशी नाराजी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी व्यक्त केली. रविवारी पहाटे शहरात चोरट्यांनी भर बाजारपेठेत चोरी केलेली तेंव्हा पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असते तर तपास काम अधिक वेगाने झाले असते असे मत श्री. सुर्याजी यांनी व्यक्त केले आहे.
दोन महिन्यांपूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेतील बंद अवस्थेत असणारे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी आम्ही केली होती. पोलिस अधीक्षकांसह स्थानिक पोलिसांना निवेदन देत याबाबतची मागणी केली होती. मात्र, त्याकडे पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले. अन्यथा, आज झालेल्या चोरीचा छडा लावताना तपास वेगाने होण्यास मदत झाली असती. खासगी दुकानदारांचे सीसीटीव्ही नसते तर परिस्थिती अधिक गंभीर असती अशी नाराजी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे