न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

राज्यातील ८० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली:मनोज जरांगे

जालना/

राज्यातील ८० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली आहे. मी गेल्या ८ महिन्यांत विखे पाटील यांना अनेकदा फोन करून हा विषय त्यांच्या कानावर घातला. महामंडळाच्या विषयात परतावे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे तब्बल ६०० कोटी रुपये थकले आहेत…. असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत.

सरकारला जे सत्य आहे ते करावंच लागणार… हैदराबादचा जीआर काढला, आता प्रमाणपत्र का देत नाही? असा प्रश्न देखील जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.मी पैशाने, पदाने फुटत नाही. मला कोणी दाखवून द्यावं की मी एक रुपया तरी घेतला, मी उद्या सकाळी फाशी घेतो, नाही घेतला तर दोन बापाचा औलाद. सरकारने फक्त एकदा सांगावं की याला १ रुपया दिला, ७०० रुपयाचं काम दिलंय, हे कोणीही सांगावं… असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत.

त्या दिवशी आमच्या माता-भगिनींवर लाठ्या चालवल्या गेल्या, तेव्हा आम्ही गप्प का बसावं? रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला उचलायला पोलीस तयार नव्हते. छातीवर पाय देऊन बंदुकीच्या दस्ताने मारलं होतं. तुम्ही हे सहन करून दाखवला का ? “असा सवाल त्यांनी विचारला. आमच्या आईला मारलं, तुमच्या आईवर का बोलू नये? असा थेट सवालही जरांगे यांनी यावेळी लाड यांना विचारला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे