न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बेंगळुरू विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात टळला

बंगळुरू/ विनूथा के आर 

बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी एक थरारक घटना घडली. दिल्लीहून बंगळुरुला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा लँडिंगदरम्यान भीषण अपघात होता होता टळला.

धावपट्टीवर उतरत असताना विमानाचा मागचा भाग अचानक रनवेला घासल्याने टेलस्ट्राइक झाला. सुदैवाने पायलटच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला असून विमानात असलेले सर्व 179 प्रवासी आणि क्रु मेंबर्स सुरक्षित आहेत.

एअर इंडियाचे ‘AI2651’ हे ए320 विमान गुरुवारी दिल्लीहून उड्डाण करुन बंगळुरुला येत होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, हे विमान जेव्हा बंगळुरु विमानतळावर उतरण्याच्या अंतिम टप्प्यात होते, नेमक्या त्याच वेळी तिथल्या रनवेवरुन एक प्रचंड मोठे बोइंग 747 विमान टेकऑफ करत होते. बोइंग विमान हवेत गेल्यानंतर तिथे हवेचा मोठा दाब आणि वादळ निर्माण झाले. यामुळे एअर इंडियाच्या विमानाचा बॅलेन्स बिघडला.”
विमान रनवेला घासल्याचे समजताच विमानतळ प्रशासन आणि एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. विमानात एकूण 179 जण होते. मात्र, पायलटने अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळली आणि विमान सुरक्षितपणे खाली उतरवले. सर्व प्रवाशांना कोणतीही इजा न होता विमानाबाहेर सुरक्षित काढण्यात आले.

या गंभीर घटनेनंतर एअर इंडियाने तात्काळ खबरदारीचे पाऊल उचलले आहे. विमानतळावर उतरताच या विमानाला पुढील उड्डाणासाठी रोखून धरण्यात आले असून ते सेवेतून तात्पुरते हटवण्यात आले आहे. त्यामुळे बंगळुरुहून दिल्लीला जाणारी परतीची फ्लाईट रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, एअर इंडियाच्या ग्राउंड स्टाफने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना दुसऱ्या पर्यायी विमानांची व्यवस्था करुन दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे