न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

डिचोली खून प्रकरणातील सावंतवाडीतील फरार युवक ताब्यात… मुलींशी लग्नास नकार दिल्याने केला खून

डिचोली/

तालुक्यातील चिकणे-कुडणे येथील शैला संजय घाडी या ५८ वर्षीय महिलेचा खून करून फरार झालेल्या सागर रमेश राऊळ (वय ३४ वर्षे, रा. सावंतवाडी) या संशयिताला मुंबई पोलिसांच्या सहकार्याने अटक करण्यात डिचोली पोलिसांना यश आले. घाडी यांच्या धाकट्या मुलीशी विवाहाला नकार दिल्याने सागरने हे कृत्य केले.

संशयित सागर याला मीरा भाईंदर-ठाणे येथील प्रथम श्रेणी न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर केले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून डिचोली पोलिस स्थानकात आणणार असल्याची माहिती डिचोली पोलिस स्थानकातून देण्यात आली. खून केल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या सागरच्या शोधासाठी डिचोलीचे पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार केली होती. त्यानंतर सावंतवाडी, कोल्हापूर, मुंबईत पथक गेलं. आणि तिथेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशयिताला पकडले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे