न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अवैध दारूची वाहतूक करणारा सावंतवाडीत पोलिसांच्या जाळ्यात; दोन दुचाकींसह ८५ हजारांचा माल जप्त

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सावंतवाडी शहरात गोवा बनावटीच्या दारूची विनापरवाना अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्या एका संशयितावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार साहेबराव भुजबळ यांच्या तक्रारीवरून श्रीकांत चंद्रकांत आजगावकर (वय ५७, रा. सालाईवाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर रोजी रात्री ९.२० वाजेच्या सुमारास सावंतवाडी येथील मिलग्रीस चर्चच्या बाजूला संशयित आरोपी श्रीकांत आजगावकर हा आपल्या ताब्यातील दुचाकी गाड्यांच्या डिकीमध्ये गोवा बनावटीची दारू ठेवून विक्री करत असताना पोलिसांना मिळून आला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे १ लाख ५५ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये ७५,००० रुपये किमतीची ज्युपिटर दुचाकी आणि ७५,००० रुपये किमतीची दुसरी ज्युपिटर दुचाकी तसेच डिकीमध्ये लपवून ठेवलेल्या विविध नामांकित कंपन्यांच्या (डीएसबी ब्लॅक, ओकस्मिथ, रॉयल स्टॅग, बुलेट ७७ काजू फेणी, गोल्डन एआयएस, कमांडर, ओल्ड माँक, मॅजिक मोमेंट्स व्होडका, मॅकडोवेल्स, ब्लेंडर्स प्राइड, सिग्नेचर, रोमानोव्ह व्होडका, रॉयल चॉईस कोकोनट फेणी इत्यादी) गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या असा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार जाधव यांनी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, पोलीस हवालदार शिंदे, राऊळ आणि भुजबळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपीला बीएनएनएस ३५(३) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली असून, अधिक तपास पोलीस हवालदार शिंगाडे करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे