नागपूरहून कोल्हापूर येणा-या खाजगी बसला भीषण आग… बस जळून खाक
लातूर/
नागपूरहून कोल्हापूर कडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सला, लातूरमध्ये पहाटे भीषण आग लागली,
लातूर सोलापूर महामार्गावरच्या तुलसी हॉटेल समोर पहाटे साडेतीन वाजता एका खाजगी ट्रॅव्हल्स ला शॉटसर्किट मुळे आग लागली,
ट्रॅव्हल्स मधील 35 प्रवाशांना चालकाच्या प्रसंगावधानामुळे बाहेर काढण्यात यश आल आहे.
तर सुदैवाने कुठली जीवितहानी नाही ,मात्र या भीषण आगीत ट्रॅव्हल्स पूर्णपणे जळून खाक झाली आहे”


